E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

वऱ्हाड निघालय लंडनला (२०२३ )

मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > नाटक > वऱ्हाड निघालय लंडनला (२०२३ )
18
June
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > नाटक > वऱ्हाड निघालय लंडनला (२०२३ )

वऱ्हाड निघालय लंडनला (२०२३ )

18 जून 2023 मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू आयोजित वऱ्हाड निघालंय लंडनला ह्या एकपात्री नाटकाचा प्रयोग न्यू होरायझन कॉलेजच्या नाट्यगृहात सादर झाला. प्रा. लक्ष्मणराव देशपांडे लिखित ह्या नाटकाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. 18 जून 2023 रोजी संदीप पाठक यांनी, त्यांचा 475 वा प्रयोग सादर केला. त्यांच्या दमदार आणि कसदार अभिनयाने दर्दी, नाट्यप्रेमी रसिकांची मने जिंकली. हास्य विनोदात अडीच तीन तास कसे गेले ते कळलेच नाही. प्रयोग संपला तरी रसिक जमिनीवर उतरले नव्हते. संदीप पाठक यांनी मनोरंजन तर केलेच आणि सगळ्यांबरोबर फोटोही काढले. पांडुरंग हरी चा जागर करून पंढरीच्या वारीचे सौख्य दिले.

वऱ्हाड निघालय लंडनला अभिप्राय –

1) नाटक ही एक अनुभूती असते. नाटक म्हणजे केवळ रंगमंचावर पात्रांचं वावरणं नाही, तर त्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेले लहान/मोठे, उथळ/गहिरे, वैविध्यपूर्ण भावनिक तरंग. साहजिकच आहे की, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, अशा अनेक गोष्टींमुळे नाटक अधिक समृद्ध आणि प्रभावशाली होतं. यापैकी कोणत्याही साधनाचा उपयोग न करता केवळ एका माणसाने एक कथानक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर हुबेहूब उभे करणे ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे, आणि संदीप पाठक यांनी हे आव्हान अतिशय समर्थपणे पेललंय, “वऱ्हाड निघालंय लंडनला” च्या प्रयोगात!

“वऱ्हाड निघालंय लंडनला” हे प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांचं एकपात्री नाटक लहानपणापासून ऐकिवात होतं, पण पाहण्याचा योग आज प्रथमच आला. (देशपांडे हा प्रयोग कसा करीत त्याचे फक्त किस्सेच ऐकले आहेत). संदीप पाठक यांनी नक्कीच त्यांचा स्वतःचा ठसा “वऱ्हाड” वर उमटवला आहे.
नैसर्गिक अभिनय, भाषिक वैशिष्ट्ये जपत केलेली संवाद-फेक, उत्कृष्ट कालावधान (timing), संवादांमधील स्थलकालानुरूप बदल (improvisations), विविध प्रकारचे आवाज (विमान, आगगाडी,..) अशा अनेक गोष्टींमुळे प्रेक्षक ह्या प्रयोगात अगदी तल्लीन झाले होते. छान करमणूक झाली आणि भरपूर हसलो!
हे नाटक आयोजित केल्याबद्दल ‘मराठी प्रतिष्ठान बेंगळूरू’ चे आभार!

2)मराठी प्रतिष्ठान बेंगलोर आयोजित वऱ्हाड निघालय लंडन ला ह्या एकपात्री नाटकाचा 475 वां प्रयोग अतिशय नियोजन पूर्ण पद्धतीने पार पडला, आपल्या व्यस्त जीवनातून थोडासा वेळ काढून प्रेक्षकांनी हसण्याचा मन मुराद आनंद घेतला व कलाकार श्री संदीप पाठक यांचे जबरदस्त अभिनयाने आक्खा auditorium गलबलून गेला, चिल्ली पिल्ली बच्चे कंपनी तर भलतीच खुश होती, बावन्न वेगवेगळ्या व्यक्तीचे आवाज काढून हुबेहूब आपणा समोर लग्नाच्या लगीन घाई चे चित्र उभा करणारा अवलिया भेटला, ट्रेन चे आवाज, विमानाचे आवाज लोकांना अचंबित करणारे होते, आसा दमदार प्रयोग व्यवस्थित पणे आयोजित करून सफल केल्याबद्दल टीम बेंगलोर मराठी प्रतिष्ठान चे मनापासुन आभार, मी ह्या जबरदस्त ग्रुप चा एक भाग आहे ह्याचा खुप अभिमान वाटतो, पुन्हा एकदा धन्यवाद

3)कालच नाटक खरंच एक super अनुभव होता म्हणजे नाटक तर उत्तम आहेच आणि उत्तम सादरीकरण ह्याला तोड नाही…ह्या आधी ही हे नाटक बघितले आहे पण संदीप पाठक ह्यांनी पुन्हा एकदा ते गाव, ती माणसं , ते कुटुंब आणि मुख्य म्हणजे प्रवास आणि वऱ्हाड असे डोळ्यासमोर उभे केले…. कोणत्याही प्रकारचा set नाही , lights, sounds वेगळे वापरलेले नाहीत तरीही पूर्ण रंगमंच पात्रांनी भरलेला …प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा ….

बंगलोर मराठी प्रतिष्ठानचे खूप आभार 🙏
1000 वा प्रयोग ही बंगलोर मधेच होवो आणि housefull होवो
4)आज नम्म बेंगलुरू येथे वऱ्हाड निघालंय लंडनला ह्या एकपात्री नाटकाचा प्रयोग संदीप पाठक यांनी सादर केला. ते सादर करीत असलेला हा 475 वा प्रयोग होता. दोन तीन तास निखळ मनोरंजन होते. संदीप पाठकांचा अभिनय, हावभाव, आवाज, रंगमंच्यावरचा वावर सगळेच प्रेक्षणीय होते. वेळ कसा गेला ते समजलेच नाही.

Venue

Banglore

Details

Date:
June 18, 2023
Time:
11:00 AM - 01:00 PM
Categories:
नाटक