नमस्कार मंडळी!
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू हे रजिस्टर्ड मंडळ आहे. मराठी प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ सन २०१७ साली रोवली गेली. झाडापासून विलग झालेलं फळ दूर कुठेतरी जाऊन रुजतं आणि त्यातून छोटंसं रोपटं जन्माला येतं. त्या लहानशा रोपट्याचा मग वटवृक्ष होऊ लागतो आणि मग तो तऱ्हेतऱ्हेच्या प्राणी पक्षांचा आधारवड बनतो. कितीही दूर जाऊन रुजलं, नव्या मातीत तग धरून उभं राहिलं तरी त्याच्यातील मूळ गुणधर्म काही बदलत नाहीत. परंपरेने वाहत आलेले संस्कार त्याच्या अंगी त्याही ठिकाणी असतातच.