E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740
25
June
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > कार्यक्रम > रम्य ते बालपण -आठवणीतले खेळ

रम्य ते बालपण -आठवणीतले खेळ

माहिती

“मराठी प्रतिष्ठान बेंगलोर ” ची स्थापना झाल्यानंतर कोणते उपक्रम करायचे याची रूपरेषा आखण्यात आली. त्यानुसार आमच्या मंडळाचा पहिला कार्यक्रम २५ जुन २०१७रोजी पार पडला तो “रम्य ते बालपण”. कॅरम, बुद्धिबळ या खेळांबरोबरच नवीन पिढीला आपल्या बालपणीचे हरवत चाललेले खेळ ह्याची ओळख करून देण्यासाठी लिंबू-चमचा, चिप्पी, भवरा फिरवणे, गोट्या, चौपट-सापशिडी, तीन पायांची शर्यत, संगीत खुर्ची अश्या अनेक खेळाचे नियोजन मंडळाने केले. त्याचबरोबर जोडीला अस्सल मराठी पद्धतीच्या जेवणाचा आनंदही लुटला. लहानग्यांना आपल्या बालपणीचे खेळ खेळण्यात रमलेलं बघितलं आणि त्यांच्यात स्वतःचं बालपणही आपसूकच दिसलं

Venue

Bangalore, Karnataka

Details

Date:
June 25, 2017