E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

एमपीबीचा फेवरेट कोण नृत्य स्पर्धा: 2026

मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > कार्यक्रम > एमपीबीचा फेवरेट कोण नृत्य स्पर्धा: 2026
10
January
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > कार्यक्रम > एमपीबीचा फेवरेट कोण नृत्य स्पर्धा: 2026

एमपीबीचा फेवरेट कोण नृत्य स्पर्धा: 2026

एमपीबीचा फेवरेट कोण नृत्य स्पर्धा: बेंगलोरमध्ये नुपूर निनादले!
नमस्कार मित्रांनो! १० जानेवारी रोजी बेंगलोरमध्ये मराठी प्रतिष्ठान बेंगळुरूने बृहनमहाराष्ट्र मंडळ, दिल्लीच्या सहकार्याने ‘एमपीबीचा फेवरेट कोण’ ही नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. ह्या कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून आस्वाद फूड्स, अरविंद कन्सल्टन्सी, शुभश्री इन्शुरन्स आणि वे टू वेड मॅट्रिमोनिअल सर्व्हिसेस यांचे विशेष सहकार्य लाभले.
परीक्षकांचे स्वागत केल्यावर दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. परीक्षणाची अवघड जबाबदारी सिनेअभिनेत्री अश्विनी चवरे, क्षितीजा रेडकर आणि अनुश्री देशपांडे यांनी पार पाडली.

५ ते ५५ वर्ष वयोगटातील जवळपास ३५ हून अधिक स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला. प्रत्येकाने एकापेक्षा एक सरस नृत्य सादर केली.
वैयक्तिक गटातील स्पर्धकांनी प्रत्येकी दोन नृत्य सादर केली, तर जोडीतील स्पर्धकांनी एक नृत्य सादर केले. संपूर्ण वेळ मंचावरून घुंगरांचा आणि सभागृहातून प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. खाण्याच्या स्टॉल्सवरही लोकांची गर्दी होती. सर्वत्र खेळीमेळीचे वातावरण आणि आनंदाचा जल्लोष होता.
भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झालेल्या नृत्य स्पर्धेच्या निकालासाठी प्रत्येक जण उत्सुक होता. स्पर्धा अतिशय चुरशीची झाल्याने निकाल जाहीर करण्यास परीक्षकांना अंमळ वेळ लागला.
आता निकाल जाहीर –
पहिल्या वयोगटात (५ ते १२ वर्ष):
पहिलाः रेयांश हिरे , दुसरीः अननया भोसले, तिसरीः क्षिती देशमुख.
दुसऱ्या वयोगटात (१३ ते १९ वर्ष): पहिली लावण्या भोसले, दुसरी धृती हिरे, तिसरी मनवा जोशी.

तिसऱ्या वयोगटात (२०+ वर्ष): पहिली वैदेही पराडकर, दुसरा निखिल मसंगी, तिसरी सयाली परासरे.
जोडी गटात: पहिली ‘नृत्य तरंग’ – मिनल आणि त्रिशा, दुसरी ‘ट्वर्लिंग ट्विन्स’ – सुरभी आणि आभा, तिसरी ‘सोल स्टेप्स’ – मनाली आणि मन्वा
विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक असे भव्य बक्षीस देण्यात आले. संपूर्ण स्पर्धा आनंदात आणि खेळीमेळीत पार पडली. मराठी संस्कृतीचा गौरव वाढवणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला!

धन्यवाद!

Venue

gandhinagar,Bangalore

Details

Date:
January 10, 2026
Time:
10:00 AM - 05:00 PM