E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

श्रावण सरी-खेळ पैठणीचा (2023)

मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > स्पर्धा > श्रावण सरी-खेळ पैठणीचा (2023)
6
August
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > स्पर्धा > श्रावण सरी-खेळ पैठणीचा (2023)

श्रावण सरी-खेळ पैठणीचा (2023)

बेंगलुरू मधील मराठी मंडळींचा आवडता कार्यक्रम श्रावण सरी दिनांक 06/08/2023 रोजी जोशपूर्ण वातावरणात महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुच्या सभागृहात संपन्न झाला. आबालवृद्धाच्या उत्साहाने वातावरण भरून गेले होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मुलांसाठी वेशभूषा आणि चित्रकला स्पर्धा ठेवली होती. 20 मुलांनी वेशभूषा स्पर्धेत तर 25 मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. मोठ्यांचा पोशाख परिधान केलेली चिमुकली खूप गोड दिसत होती. त्यांचा धीटपणा सर्वांना भावला.

ह्या कार्यक्रमात संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असावा म्हणून वात्सल्य ही स्पर्धा घेण्यात आली. आई किंवा बाबांनी आपल्या चिमुकल्याबरोबर एकसारखे कपडे घालायचे अशी संकल्पना होती. पालकांना मजेशीर प्रश्न विचारल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली. ह्या स्पर्धेत 10 पालकांनी आपल्या मुलाबरोबर सहभाग घेतला.

श्रावण सरीचे मुख्य आकर्षण होते… मि. अँड मिसेस एम पी. बी! ह्या स्पर्धेत तब्बल 12 जोड्या सहभागी झाल्या होत्या. कल्पक खेळांमुळे प्रेक्षक सुद्धा ह्या स्पर्धेत रममाण झाले. ह्या स्पर्धेच्या एकूण आठ फेऱ्या झाल्या.
शेवटच्या फेरीसाठी सर्वाधिक गुण मिळवून खालील जोड्या पात्र झाल्या.
1) केतकी अभिषेक नन्नोरे
२) दिपिका अजय हिरे
३) स्नेहा गौतम आठवले
४) मेधा सचिन बनकर
५) नम्रता प्रदिप रंगोळे
मानाची पैठणी आणि फेट्याचे मानकरी ठरले…केतकी आणि अभिषेक नन्नोरे
आपल्या मंडळाचे आधार स्तंभ श्रीधर धावड यांनी पैठणी आणि फेटा पुरस्कृत केला होता.

सर्व सहभागी मुलांना प्रशस्तिपत्रक आणि भेट वस्तू देण्यात आली. ह्या भेटवस्तू नंदकुमार स्वामी ह्यांच्या सौजन्याने देण्यात आल्या.

मध्ये गाणी, गंमतशीर प्रश्न, मुलांचा दंगा सुरूच होते. सकाळी सुरु झालेल्या मनोरंजनाच्या श्रावणसरी संध्याकाळपर्यंत बरसतच होत्या.

विविध स्पर्धा आणि त्याचे विजेते
वात्सल्य स्पर्धा :
प्रथम क्रमांक – राजन आणि ऋत्विक
द्वितीय क्रमांक – शशांक आणि शौनक
तृतीय क्रमांक – शितल आणि ओवी
उत्तेजनार्थ – मेघा आणि साचीप्रथम

वेशभूषा स्पर्धा :
लहान गट

प्रथम क्रमांक – रियांश हिरे
द्वितीय क्रमांक – ऋत्विक दवंडे
तृतीय क्रमांक – गिरीजा पाटील
उत्तेजनार्थ – देवांश नन्नोरे

मोठा गट :
प्रथम क्रमांक – सुरभि आठवले
द्वितीय क्रमांक – ओवी शिंदे
तृतीय क्रमांक – साची बनकर

चित्रकला स्पर्धा :
लहान गट
अवनिश पाटील – प्रथम
गिरीजा पाटील -द्वितीय
लितीक्षा – तृतीय

मोठा गट –
विहान जगताप – प्रथम
त्रिशा बनकर – द्वितीय
ओवी कुलकर्णी – तृतीय

 

Join the event

Join the event

Venue

Banglore

Details

Date:
August 6, 2023
Time:
11:00 AM - 04:00 PM
Categories:
स्पर्धा