E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

एक दिवस तिच्या मधल्या 'ती' साठी(महिला दिन- २०२४)

मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > कार्यक्रम > एक दिवस तिच्या मधल्या ‘ती’ साठी(महिला दिन- २०२४)
2
March
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > कार्यक्रम > एक दिवस तिच्या मधल्या ‘ती’ साठी(महिला दिन- २०२४)

एक दिवस तिच्या मधल्या ‘ती’ साठी(महिला दिन- २०२४)

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो, हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तो साजरा पण करतो… मग मराठी प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य काय?…. तर ह्या समूहातील पुरुषांनी खास महिलांसाठी हा दिवस साजरा केला.
एक दिवस तिच्या मधल्या ‘ती’ साठी…
2 मार्च रोजी महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. भरपूर खेळ, गाणी, नाच, झुंबा, गप्पा आणि हिरकणी पुरस्कार वितरण असा भरगच्च कार्यक्रम होता. प्रत्येक खेळ नवीन होता, कल्पक होता. आयोजकांनी घेतलेली मेहनत पदोपदी जाणवत होती. खेळात सहभागी प्रत्येकीला भेटवस्तू देण्यात आल्याने महिलांवर्गाच्या चेहऱ्यावर हसू विलसत होते.
पहिल्या पाच विजेत्यांना विशेष बक्षिसे देण्यात आली.
प्रथम – सोन्याची नथ – श्वेता बच्चे
द्वितीय – चांदीचा दिवा – सुलोचना पाटील
तृतीय – तन्मणी – रुपाली दबडे
चतुर्थ – ऑक्सिडाइज्ड हार – पल्लवी पाटील
पंचम – गळ्यातला हार – ज्योती कुंटे
ह्याच कार्यक्रमात हटके काम करणाऱ्या महिलांचा ‘हिरकणी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. नामांकन कोणीही करू शकणार असल्यामुळे बेंगळूरुमधील मराठी माणसांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. त्यातील सर्वोत्तम 9 जणींना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1. गायत्री प्रवीण
2. प्रियंका अशोक जाधव
3. भक्ती ढमढेरे
4. मनाली जोशी
5. स्मिता बर्वे
6. शालन मुरगोड
7. डॉ.पल्लवी जोशी
8. वैशाली सावंत
9. सृष्टी धावड
विशेष म्हणजे आपल्या अर्धांगिनीला खेळात सहभागी होता यावे म्हणून खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल ‘अहो नी’ सांभाळले होते.
मराठी प्रतिष्ठानच्या कमिटीतील महिलांना बनारसी स्टोल देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या माणसांना, मैत्रिणींना, गृहिणींना आनंदी ठेवण्यासाठी सगळेच काही ना काही करत असतात, पण असा सार्वजनिक सोहळा विरळाच. असे दर्जेदार आणि हटके कार्यक्रम हे मराठी प्रतिष्ठान चे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
पुढील वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा प्रत्येकजण बरोबर घेऊन गेली यात शंका नाही.

Join the event

Join the event

Venue

Banglore

Details

Date:
March 2, 2024
Time:
02:00 PM - 05:00 PM