राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि बृन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी निबंध स्पर्धा आणि मराठीच्या परीक्षा घेतल्या जातात. 2021मध्ये झालेल्या परीक्षांचा बक्षीस समारंभ 3 डिसेंबर 2022 रोजी बेळगावी येथे संपन्न झाला.
कार्यक्रम सुनियोजित आणि प्रेक्षणीय होता. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार ह्याची कल्पना होती, पण त्याबरोबरच केंद्र प्रमुख आणि मार्गदर्शक शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला. आमच्यासाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता.निरपेक्ष भावनेने केलेल्या कामाचे असे कौतुक होणे आमच्यासाठी अविस्मणीय आहे. पहिल्याच वर्षी मराठी प्रतिष्ठान बंगळुरूच्या, ओळख मायबोलीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश उल्लेखनीय आहे.
माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, बृहनमहाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद महाजन, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील आणि सर्व पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
ओळख मायबोलीचे विद्यार्थी विहान जगताप आणि ओवी शिंदे, केंद्र प्रमुख श्री. बापूसाहेब शिंदे आणि विद्यार्थी मार्गदर्शक सौ. स्मिता बर्वे ह्यांचा ह्या समारंभात सत्कार करण्यात आला.