E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

आमच्याबद्दल थोडं

नमस्कार मंडळी!

मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू हे रजिस्टर्ड मंडळ आहे. मराठी प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ सन २०१७ साली रोवली गेली. झाडापासून विलग झालेलं फळ दूर कुठेतरी जाऊन रुजतं आणि त्यातून छोटंसं रोपटं जन्माला येतं. त्या लहानशा रोपट्याचा मग वटवृक्ष होऊ लागतो आणि मग तो तऱ्हेतऱ्हेच्या प्राणी पक्षांचा आधारवड बनतो. कितीही दूर जाऊन रुजलं, नव्या मातीत तग धरून उभं राहिलं तरी त्याच्यातील मूळ गुणधर्म काही बदलत नाहीत. परंपरेने वाहत आलेले संस्कार त्याच्या अंगी त्याही ठिकाणी असतातच.

सहकाऱ्यांनो, आपली कथाही काही वेगळी नाही. करियर निम्मत, कामानिमित्त आपलं घर सोडून बेंगलोरला स्थायिक झालेल्या काही तरुण मंडळींनी मराठी माणसांसाठी “मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू” या सांस्कृतिक मंडळाची पायाभरणी केली.बापूसाहेब शिंदे, गणेश राऊत, नंदकुमार स्वामी, विजय पाटील, अर्चना पाटील, प्राची दीक्षित व निलेश राणे या संस्थापक कमेटी सभासदांनी आपलं घर, नोकरी, छंद यातून वेळ काढून “मराठी प्रतिष्ठान बेंगलोर”च्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. सुरुवातीला बेंगलुरू  स्तिथ मराठी लोकांसाठी विविध उपक्रम, सण साजरे करणे अश्या छोट्या मोट्या कार्यक्रमाच्या आयोजनाने झाली.

नंतर मंडळातील कमेटी सभासदांना वाटले कि आपण ह्याला एका नोंदणीकृत मंडळाचे रूप द्यावे जेणेकरून आपल्याला अजून चांगले उपक्रम राबवता येतील व त्या दिशेने वाटचाल सुरु झाली व  ३० ऑक्टोबर २०१७ रोजी “मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू” हे  नॉन-प्रोफीटेबल अधिकृत मंडळ म्हणून नोंदणीकृत झाले. आजपर्यंत ह्या मंडळातर्फे विविध उपक्रम राबवले गेले आहेत. इंडोर गेम्स स्पर्धा, संक्राती, वटपौर्णिमा,दिवाळी, क्रिकेट सामने, सामाजिक संस्थांना मदत, नाटक , विविध कला गुणदर्शन स्पर्धा  इ.तसेच मराठी नाटकांचं आयोजन (वह्राड निघालाय लंडनला),तसेच स्थानिक आणि महाराष्ट्रस्तीथ नवनवीन नृत्य, गायक,वक्ते अशा कलाकारांना बेंगलोर मध्ये एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम ह्या मंडळाने केले आहे. जास्तीती जास्त मराठी लोकांना एकत्र आणणे, तसेच त्यांना जमेल ती मदत करण्यासाठी हे मंडळ तत्पर असते.

मराठी प्रतिष्ठान फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप  या सोशल प्लॅटफॉर्म वरती सुद्धा ऍक्टिव्ह आहे .मराठी भाषेसाठी, संस्कृतीसाठी व माणसासाठी काहीतरी  करत राहण्याची आमची इच्छा आहे. तशी आपलीही इच्छा असेल तर कसलाही संकोच न बाळगता आपण मंडळाशी संलग्न होऊ शकता. ” मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू” हे रोप वटवृक्षात कसा परिवर्तित होईल यासाठी आपण सोबत काम करूयात! तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर वरतीही संलग्न होऊ शकता..

बेंगलोर मध्ये अनेक छोटी-मोठी मराठी मंडळ आहेत. सर्वांचे आपआपल्यापरीने मराठी माणसाला एकत्र ठेवण्यासाठी विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याचे प्रयत्न सुरु असतात. आपली मराठी संस्कृती परराज्यात जपण्यात, रुजवण्यात यांसारख्या मंडळांचं मोठं योगदान आहे.वास्तविक पाहता बेंगलोरचा भौगोलिक विचार करता सर्वांना सर्वच ठिकाणी जाता येत नाही किंवा काही कार्यक्रमांची माहिती सर्वांपर्यंत पोहचत नाही. अशावेळी ही सर्व मंडळी एकमेकांच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्तीत लोकांचा प्रतिसाद कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत असते.