मराठी प्रतिष्ठान, बंगळूर

श्रावणसरी २०१८

मराठी माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तरीही आपली परंपरा विसरत नाही. अगदी कुठल्याही व्यवसायात कितीही व्यस्त असला तरी मराठमोळे सण आणि परंपरा यांचा विसर पडू देत नाही. बंगळुरू येथे नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला मराठी समाज देखील याबाबत मागे नाही. येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी जनांचे ऐक्य व संघटन साधणारी संघटना ‘मराठी प्रतिष्ठान बंगलुरू‘ या संघटनेने श्रावणसरी २०१८ हा कार्यक्रम ५ ऑगस्ट २०१८ रोजी पार पाडला. बंगळुरूतील राममूर्थीनगर इथे आयोजित या कार्यक्रमात बंगळुरु स्थित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतांश मराठी कुटुंबांनी उत्साहात भाग घेतला.

श्रावणमासी हर्ष मानसी ह्याला साजेशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात रांगोळी स्पर्धेने झाली. रांगोळी स्पर्ध्येची विजेत्या ठरल्या सौ.किरण राजूरकर तर उपविज्येत्या ठरल्या सौ.केतकी काळे. त्यानंतर लहान मुलांच्या श्रावण या विषयावरती चित्रकला स्पर्ध्येला सुरवात झाली वयवर्ष ३ ते १५ अश्या गटात ह्या स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्ध्येला बेंगलोर स्थित मराठी बाळ गोपाळांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला जवळ पास २०~२५ मुलांनी ह्या स्पर्ध्येत आपला सहभाग नोंदवला.

० ते ५ या वयोगटात विजयी ठरली ओवी करंदीकर तर उपविजेती ठरली आरोही कुंभार..

५ वर्ष व वरती वयोगटात विजयी ठरला तरण तोळे तर उपविजेती ठरली आरुषी पांगारकर..

ह्यानंतर लहान मुलांचा फॅशन शोची स्पर्धा पार पडली ..

विविध वेशातील , विविध रंगातील चुमुकले पाहताना रसिक भारावून गेले .. सीमेवरती लढणारा सैनिक असो, कि आपली मराठी परंपरा सांगणारी मराठी मुलगी, नेत्र दानाचे महत्व सांगणारी वेषभुशा असो कि सिग्नल व जोडीला पोलिसांचे महत्व सांगणारा पेहराव. १ वर्षाचे वारकरी असोत किंवा भुंग्यांनी त्रास दिलेली शकुंतला असो. ह्या सार्यांबरोबरच साने गुरुजी , सावित्रीबाई फुले पण शिक्षणाचे महत्व पटवून देऊन गेले..

जोडीला सुपरमॅन , बाहुबली पण हजेरी लागून गेले..

० ते १ या वयोगटात विजयी ठरला समन्यू श्रीनिवास मोरे तर उपविजेता नचिकेत आंबेकर .

१ ते ५ यावयोगटात विजयी ठरला आण्विक देशपांडे तर उपविजेता मिहीर निखिल जोशी .५ वर्ष व वरती वयोगटात विजयी ठरली अनुराधा काळगावकर तर उपविजेती ठरली ओवी शिंदे. ह्यानंतर आयोजित मॉम अँड किड्स फॅशन शोची विजेती ठरली किरण राजूरकर मराठी प्रतिष्ठानने नेहमीच लहान मुलांच्या विविध कला गुणांना एक मंच देण्याचे काम केले आहे. मग ह्या साऱ्यात नृत्य स्पर्धा कशी मागे राहील. क्लासिकल पासून हिप हॉप आणि तांडव नृत्य ते आपली मराठी ठसकेबाज लावणी ह्याची मजा जमलेल्या रसिकांनी घेतली.

सोबतीला ह्या छोट्या कलाकारांना प्रेक्षकांनी स्वइच्छेने बक्षीशे देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. स्पर्ध्येची विजेती ठरली पर्णिका कदम तर उपविज्येती ठरली आद्या धर्माधिकारी. श्रावणसरी २०१८ ह्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजे “मी अँड मिसेस एम पी बी २०१८ ” ह्या स्पर्ध्येत एकूण ६ जोडप्यांची सहभाग घेतला. स्पर्धकांना जोडीने – एकमेकाच्या साथीने करायला लावणारे काही खेळ लोकांमध्ये हास्य पिकवत होते तर स्पर्धकांनमधील एकमेकांवरील विश्वास.

सर्वात गमतीदार शेवटची फेरी होती ज्यात जोडप्यांना एकमेकांबद्दल प्रश्न विचारून त्याची उलटतपानशीं केली तेव्हा खूप मजेदार उत्तर अाली ज्याचा प्रेक्षकांनबरोबरच इतर सहभागी स्पर्धकांनी हि त्याची मजालुटली. ह्या स्पर्द्येची विजेती जोडी ठरली डॉ.सौ.प्रतीक्षा वलगावकर व श्री.सारंग वलगावकर आधुनिक जीवनशैलीचा अवलंब करताना मूळ मराठी मातीशी नाळ तुटू नये याकरिता मराठी प्रतिष्ठान बंगळुरू हे कायमच प्रयत्नशील असते.

विविध मराठी सण सामूहिकरीत्या साजरे करून परमुलूखात एक प्रकारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन मराठी प्रतिष्ठान करून देत असते. श्रावणसरी २०१८ याकार्यक्रमाच्या आयोजनात मराठी प्रतिष्ठानच्या महिला समितीच्या सभासद सौ.अनघा मसने, सौ.भाग्यश्री अडसूळ, सौ.श्रीजला जोशी, सौ.सुप्रिया कुऱ्हाडे यांचे मोलाचे नियोजन व सहकार्य लाभले. तसेच ह्मा कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे श्री. गणेश राऊत, श्री. नंदकुमार स्वामी, श्री.विजय पाटील, श्री. राहुल निंबाळकर, श्री.निलेश राणे, श्री. बापूसाहेब शिंदे,श्री. शैलेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच श्री.अजय अडसूळ, सौ.अंजनी निलेश राणे , श्री.विनय मसने, श्री.निखिल जोशी, सौ.पल्लवी विजय पाटील व सौ.प्राची बागुल ह्यांनी विविध स्पर्धेना परीक्षक म्हणून काम पहिले. श्री.बापूसाहेब शिंदे व श्री.नंदकुमार स्वामी ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.