मराठी प्रतिष्ठान, बंगळूर

ओळख मायबोलीची पर्व ३ – “ऑनलाईन वारी” (२०२१)

ओळख मायबोलीची उपक्रमाच्या पर्व ३ चा ऑनलाईन वारी सोहळा श्री. संदीप पाठक ह्यांच्या उपस्तिथीत १८ जुलै २०२१ रोजी पार पडला.

हरी ओम विठ्ठल माऊली, सध्याचा वातावरणात पंढरीच्या राजाचे दर्शन तसे अवघडच झाले आहे. मग काय जिथे आहोत तिथुनच त्या पांडुरंगाचे नामस्मरण करूयात…..आणि हो ह्या नामस्मरणात, गजरात जर आपली लहान लेकरं सामिल झाली तर?? चला तर यंदा लहान मुलांनसोबत आनंद घेऊया “ॲानलाईन वारीचा”
ह्या वारीसाठी आपल्या सोबत होते जेष्ठ सिने अभिनेते श्री संदीप पाठक, ज्यांनी दोन वर्ष वारकऱ्यानसोबत पायी वारी केली, वारीचे प्रत्येक रिंगण,मुक्काम, हरीनामाचा गजर, दिंडी, पालखी सोहळा इ. क्षण ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आणि आपल्यापर्यंत पोहचवले आहेत.
मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू आयोजित “ओळख मायबोलीची” या ॲानलाईन मराठी शाळेतील मुलांनी सादर केली
“ॲानलाईन पंढरीची वारी” रविवारी १८ जुलै ला सकाळी ११:०० वा. त्याचे थेटप्रक्षेपण आपल्या MPB च्या फेसबुक पेजवरती करण्यात आले .
संताची माहिती, अभंग, रिंगण, दिंडी, पालखी देखावा आणि वारीचा प्रत्यक्ष अनुभवाचे किस्से ई.चा आनंद मुलांनी व पालकांनी घेतला घरबसल्या आपल्या कुटुबांसह ह्या सोहळाचा आनंद घेतला