मराठी प्रतिष्ठान, बंगळूर

एमपीसीएल २०१८

मराठी प्रतिष्ठानने पारंपरिक सणांबरोबरच खेळालाही नेहमीच प्राधान्य दिले आहे. मार्च २०१८ मध्ये मराठी प्रतिष्ठानतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले गेले. बेंगलोरमधील १० मराठी संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. एकदिवसात १० संघ आणि सर्व सामने एकाच दिवशी खेळवणे ही सर्वांना अशक्यप्राय वाटणारी गोष्ट मराठी प्रतिष्ठानच्या संयोजकांनी आणि त्याचबरोबर सर्व संघानी दिलेल्या साथीने यशस्वीरित्या पार पाडली. ह्या स्पर्ध्येत कात्रेश्वर ग्रुप विजेते तर टी -कट्टा उपविजेते ठरले.